सावंतवाडी ९ डिसेंबर रोजी पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

0
15

सावंतवाडी,दि.०८: तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता करण्यात आले आहे . सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये होणाऱ्या या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे हे असणार आहेत. या वेळी प्रमुख उपस्थितीत नवयुग एज्युकेशन सोसायटी सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष उदय भोसले,मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक,ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड.संतोष सावंत,सिंधुदुर्ग प्रवीण मांजरेकर, तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी.वैद्यकीय अधीक्षक
डॉ गिरीश चौगुले, स्त्री रोग तज्ञ डॉ ज्ञानेश्वर ऐवाळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सचिव मयूर,चराटकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here