सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
सावंतवाडी,दि.०७: तालुक्यातील शिरशिंगे येथील रहिवाशी माजी सैनिक बापू शिवराम राऊळ यांच्या घरावर विज पडून घरातील उपकरणांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगटासह शिरशिंगे येथे अवकाळी मुसळधार पाऊस पडला.
यादरम्यान शिरशिंगे देऊळवाडी येथील माजी सैनिक बापू राऊळ यांच्या घरावर वीज कोसळल्याने घरातील विजेची उपकरणे, फॅन, बल्ब,लाईट बोर्ड जळाल्याने त्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतेही जीवित हानी झाली नाही मात्र श्री राऊळ यांना अचानक वीज पडल्याने विजेचा जोरदार धक्का बसला मात्र कोणतेही इजा झाली नाही. याबाबतची माहिती शिरशिंगे पोलीस पाटील गणू राऊळ यांनी कोकण दर्शन डिजिटल मीडियाला दिली.