सावंतवाडी, दि.२५ : तालुक्यातील इन्सुली कामदेव नाका येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा,अर्चा, दुपारी महाप्रसाद, तसेच दर्शनासाठी भाविक भक्तांनी गर्दी केली होती.
मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला.