आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत
वैभववाडी,दि.०५: कोकिसरे बांधवाडी येथील उबाठा गटाचे पदाधिकारी, महालक्ष्मी सोसायटी संचालक संजय नाना गजोबार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये भिकाजी गजोबार,बापू भिवा गजोबार,सरिता भिकाजी गजोबार, मयुरी गजोबार, महेश गजोबार,प्रियांका गजोबार,विकास गजोबार, अर्चना गजोबार, लक्ष्मी गजोबार, सुंदराबाई निकम, कमलाबाई गजोबार, संतोष कृष्ण गजोबार, संगीता गजोबार, सविता गजोबार, संकल्प गजोबार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कोकिसरे बांधवाडी या ठिकाणी हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, भालचंद्र साठे, हुसेन लांजेकर, बंड्या मांजरेकर व पदाधिकारी उपस्थित होते.