दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट व बोनस वाटप..
सावंतवाडी,दि.०४: कलंबिस्त दुग्ध व्यवसायिक पंचक्रोशी मर्यादित दुग्ध व्यवसाय संस्था तर्फे. दूध शेतकरी बांधवांना दिवाळी भेट व बोनस वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
दरम्यान राजन घाडी व माजी उपसरपंच रेश्मा सावंत यांचा
विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी दूध संस्थेचे चेअरमन ॲड.संतोष सावंत म्हणाले
गेली सात वर्ष सातत्याने या पंचक्रोशीत ही पहिली दुग्ध संस्था आहे या दुग्ध संस्थेने दरवर्षी दूध शेतकऱ्यांना सन्मान म्हणून दिवाळी भेट प्रेमाचे प्रतीक म्हणून आतापर्यंत देत आली आहे.
यावेळी दूध शेतकरी बांधवांना गोकुळ कडून उपलब्ध होणारा बोनस वाटप थेट खात्यात करण्यात आला आहे तर संस्थेतर्फे दिवाळी भेट देण्यात आली आहे असा उपक्रम सातत्याने घेतला जाईल या भागात पशुसंवर्धन मध्ये अधिक क्रांती करण्यच्या दृष्टीने सर्व सामाजिक राजकीय आदी क्षेत्रातील व्यक्तींच्या सहकार्याने येत्या काळात दूध संकलन वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना गायी, म्हशी वाटप उपक्रम हाती घेण्याचा संकल्प आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संस्थेचे सचिव रमेश सावंत. संचालक लक्ष्मण राऊळ, प्रकाश तावडे, शशिकांत सावंत,दूध संकलन करणारे राजन घाडी,सिद्धेश सावंत, रेश्मा सावंत,बाळू सावंत श्री राऊळ… लहू राऊळ.. आदी उपस्थित होते.