माझा उमेदवारी अर्ज मंजूर होणे हा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा आजच झालेला विजय..!

0
23

उमेदवारी अर्ज वैध झाल्यावर विशाल परब यांनी घेतले श्री देव उपरलकर आणि पाटेकर यांचे दर्शन..सावंतवाडी,दि.२९: आज झालेल्या उमेदवारी अर्ज पडताळणीत अपक्ष उमेदवार विशाल प्रभाकर परब यांचा अर्ज वैध झाला आहे.
विशाल परब यांनी याबद्दल आनंद व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत.दरम्यान आज श्री परम यांनी देवकर आणि पाटेकर यांचे दर्शन घेऊन यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री विशाल परब म्हणाले की “श्री स्वामी समर्थ महाराज, श्री देव उपरलकर, श्री देव पाटेकर, माझ्या मतदार संघातील सर्व देव-देवता, संतमहात्मे, प्रत्येक गावातील गावकरी मंडळी, गोरगरीब जनता, माझ्या मायमाऊली, माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला इथला युवावर्ग आणि या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीमुळे आज माझा उमेदवारी अर्ज मंजूर झाला आहे. खऱ्या अर्थाने माझा विजय आजच झाला आहे, असे मी या जनतेला सांगू इच्छितो. मी माझ्या आयुष्यातील तन-मन धन गोरगरीब जनतेसाठीच अर्पण करणार असून, या सर्वांच्या स्वप्नांच्या, इच्छा आकांक्षाच्या पूर्ततेसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करणार आहे.”विशाल परब यांचा अर्ज मंजूर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे. येणाऱ्या काही दिवसात नियोजनबद्ध प्रचाराची रचना आखण्यात आली असून विशाल परब यांचा विजय हा जनतेचाच विजय असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here