महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात भरती प्रक्रिया २५ तारखेपासून..

0
116

८ हजार १६९ पदांसाठी भरती.. फॉर्म भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून मदत केली जाणार.. अर्चना घारे परब

सावंतवाडी,दि.२३: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात भरती प्रक्रिया २५ तारखेपासून सुरू होणार आहे.
यामध्ये ८ हजार १६९ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीकडून मदत करण्यात येणार आहे,अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब यांनी आज सावंतवाडीत पत्रकार परिषद घेत दिली.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, काशिनाथ दुभाषी, ऍड. सायली दुभाषी, राकेश नेवगी, चित्रा बाबर-देसाई, रिद्धी परब, रोहन परब आदी उपस्थित होते.

सौ घारे म्हणाल्या, सावंतवाडी शहरात गेली दोन वर्षे नाक्या- नाक्यावर दारू तसेच अंमली पदार्थ विकले जात आहेत. घरपोच डिलिव्हरी सुद्धा दिली जत आहे. याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष आहेत. नोकऱ्या नसल्यामुळे तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळली आहे. त्याचा फायदा हे अवैध धंदे करणारे घेत आहेत. हे सर्व प्रकार थांबणे गरजेचे आहे. यासाठी महिला राष्ट्रवादी आक्रमक होणार असून रस्त्यावर उतरण्याचीही आमची तयारी आहे, असा इशारा त्यांनी दिला. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यात ८ हजार १६९ रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २५ जानेवारी पासून सुरू होणारं आहे. यावेळी हे अर्ज भरण्यासाठी युवक-युवतींना आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून मदत करणार आहोत. तरी या संधीचा फायदा बेरोजगारांना घ्यावा, असे आवाहन घारे यांनी यावेळी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here