महाविकास आघाडी मधून सावंतवाडी विधानसभेसाठी अर्चना घारे यांनाच उमेदवारी मिळावी. पदाधिकारी यांची शरद पवार यांच्याकडे मागणी..

0
25

सावंतवाडी,दि.२०: विधानसभा मतदारसंघात कुणीही कितीही दावा केला तरी आज संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गावागावात महिलांमध्ये एकच आवाज ऐकू येत आहे तो म्हणजे अर्चना ताई. गेली सात ते आठ वर्षे सातत्याने मतदारसंघातील सर्व गावे पिंजून काढत जन सामान्यांसाठी अहोरात्र कार्य व मेहनत घेतली हे जनता विसरणार नाही.
आज आमच्या नेत्या अर्चनाताईंच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मध्ये जनसामान्य जनतेची गर्दी पाहता त्यांनी केलेल्या कामाची पोहोच पावती मिळत आहे. आज या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकरिता एका स्वच्छ चारित्र्याचा तसेच उच्चशिक्षित आणि सर्वसामान्य जनतेसाठी तळमळीने असंख्य समस्यांवर काम करणारा एक नवीन चेहरा म्हणून नावलौकिक असलेल्या लोकनेत्या सौ. अर्चना घारे परब यांनाच महाविकास आघाडी मधून उमेदवारी मिळावी अशी आमची सर्व महिला पदाधिकाऱ्यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य महिला भगिनींच्या वतीने मागणी आहे असे मत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष नीतीशा नाईक यांनी व्यक्त केले.

यावेळी महिला शहराध्यक्ष ऍड. सायली दुभाषी,युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर,महिला तालुकाध्यक्ष सौ. मारीता फर्नांडिस, सुधा सावंत, सौ. पूजा दळवी आदि उपस्थित होते.
महाविकास आघाडी कडून अर्चना घारे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह अर्चना घारे आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here