विनायक गांवस व जय भोसले यांचा राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने खान्देशात सन्मान.!

0
21

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघातर्फे धुळे येथे गौरव.

सावंतवाडी,दि .९: येथील अभ्यासू पत्रकार विनायक गांवस व जय भोसले यांचा राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्काराने दिनांक ६ रोजी खान्देशातील धुळे महानगरीत मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या तेराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा रविवार, दिनांक ६ ऑक्टोबर रोजी दाते रिजेन्सी, धुळे येथे संपन्न झाला.

पत्रकार विनायक गांवस यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार व जय भोसले यांना आदर्श प्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील, धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह, धुळे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती शितल नवले, शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले, महाराष्ट्र गोवा बार काऊन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी, आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार, पोलीस निरीक्षक मिलिंद बोरसे, आरटीओ अधिकारी धनंजय शिंदे, स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण अण्णा नेरकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण बागुल, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बंडू नाना गांगुर्डे, धुळे जिल्हा अध्यक्ष विनोद रोकडे, संघटक संतोष मिस्तरी, विनायक अहिरे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष महेश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत दारोळे आदी मान्यवरांच्या हस्ते विनायक गांवस यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्कार अजय भोसले यांना आदर्श पत्रकार पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, आरोग्य, पत्रकारिता, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योजक, वैद्यकीय, प्रभावशाली राजकीय युवा व्यक्तिमत्व आणि प्रशासन आदी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या वतीने गौरव करण्यात आला.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी दुरुस्त प्रणालीद्वारे या सोहळ्याला उपस्थित राहून स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले व सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील व वाहिदअली सय्यद यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदेशाध्यक्ष किरण बागुल यांनी केले. श्री. गांवस व जय भोसले यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here