प्रवक्ते,आमदा नितेश राणे यांनी काँग्रेस आमदार सुनील केदार,सत्यजित तांबे यांच्या वक्तव्याचा घतेला समाचार
कणकवली,दि.६: काँग्रेसचा कार्यकर्ता, नेता, आमदार काँग्रेसची जेव्हा सत्ता येईल तेव्हा लाडकी बहीण योजना बंद करू असं म्हणत असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी हे लक्षात ठेवावं की काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे सरकार चुकून या राज्यात आलं तर तुमच्या खात्यामध्ये आमचे महायुती सरकार पाठवत असलेले “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे पैसे हे काँग्रेस वाले त्याच क्षणी बंद करून टाकतील. यापूर्वी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केलेल्या असंख्य योजना जेव्हा ठाकरेंचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी बंद करून टाकल्या. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना मुख्यमंत्री लाडकी योजना नकोच आहे हे काँग्रेसचे नेते सातत्याने बोलून शिक्कामोर्तब करत आहेत.अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.ते पत्रकारांशी कणकवली येथे बोलत होते.
ते म्हणले,पहिले काँग्रेसचे नेते आणि आमदार सुनील केदार यांनी असेच काँग्रेस लाडकी बहीण योजना बंद करणार म्हणाले होते,आता सत्यजित तांबे तेच बोलत आहेत. यावरून महा विकास आघाडीला ही योजना नकोच आहे हे दिसून येते अशी टीका केली.
आमच्या मध्ये तुतारी वाले काही वाद करू शकणार नाही.पालकमंत्री रवी चव्हाण यांनी राणे साहेबांना खासदार म्हणून निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा खासदार निवडून आणण्यामध्ये रवी चव्हाण साहेबांनी दिवस रात्र मेहनत घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,काँग्रेसचे नाना पटोले यांनी विनायक राऊत साठी आता सारखी एकही मीटिंग का घेतली नाही हे सिक्रेट कधीतरी बाहेर काढायला आगेल.
दरम्यान आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी दिलेल्या शिविचा संदर्भ देत म्हणले जर संजय राऊत मध्ये हिम्मत असेल तर तोंडावर समोर येवून घाणेरडी शिवी देवून पहावी मग माझे नाव नितेश नारायण राणे आहे.हे त्याला दाखवून देईल.आम्ही हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेले आहोत. संजय राऊत सारखे दलाली करून मोठे झालेलो नाही. तू गांडूळ ची अवलाड नसशील तर तोंडावर येवून शिवी घालून दाखव असा इशाराही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.