कोंकिसरे माधवराव पवार विद्यालयातील,सहा. शिक्षक रामचंद्र शिवराम घावरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..

0
126

उद्या रविवारी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण

वैभववाडी, दि.२८: येथील कोकीसरे माधवराव पवार विद्यालयातील सहा. शिक्षक रामचंद्र शिवराम घावरे यांना त्यांनी दिलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबाबत तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबाबत त्यांच्या कार्याची दखल घेऊन कास्ट्राईब शिक्षक संघटनेने ‘महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर केला आहे.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेने उद्या रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यस्तरीय शिक्षण परिषद सावंतवाडी येथे आयोजित केली आहे. या शिक्षण परिषदेमध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर, हस्ते करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here