सावंतवाडी,दि.१८: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीतून माजगांव आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय कामकाजासाठी कॉम्प्युटर व प्रिंटर मंजूर करण्यात आला होता.
दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते माजगांव आरोग्य उपकेंद्राला तो सुपूर्द करण्यात आला.
यावेळी उपतालुका प्रमुख संजय माजगांवकर, उपविभागप्रमुख रुपेश नाटेकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुप्रिया धाकोरकर, आरोग्य सहाय्यक, निरवडे सौ. सारिका धूरी, आरोग्य सेवीका सौ. पी. ए. नाईक, आरोग्य सेवक श्री. एस. एस. वेटे, आशाताई सौ. अक्षता सावंत, सौ.सुजाता धुरी,श्रीम.नेहा जाधव, श्रीम. गायत्री मयेकर, श्रीम. अर्चना कासार, श्रीम. सुजाता सावंत, चंद्रकांत रंगसुर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Home news chanal शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीतून माजगांव आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय कामकाजासाठी कॉम्प्युटर...