खाजगी महासंघाचा वार्षिक स्नेहमेळावा सातार्डा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.

0
159

अनेक पुरस्कारांचे वितरण, विविध स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात आली पारितोषिके.

सावंतवाडी-१७ महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक महासंघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांचा वार्षिक स्नेहमेळावा नुकताच सातार्डा येथे संपन्न झाला. उद्याचे सुजाण नागरिक घडवण्याचे काम आपणा सारख्या सर्वांचे आहे आणि ते आपण मनापासून करत आहात.शिक्षक महासंघाला केलेल्या कामाचे फळ नक्कीच मिळेल असे गौरवोद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शुभांगी देशपांडे यांनी व्यक्त केले. यावेळी या वार्षिक स्नेहमेळाव्यामध्ये मानाचा समजला जाणारा (कै रामचंद्र भगवान चौकेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री.गणपत रामचंद्र चौकेकर पुरस्कृत) आदर्श शाळा पुरस्कार खाजगी पसंत शाळा भडगाव सांद्रेवाडी ता. कुडाळ या प्राथमिक शाळेला देण्यात आला. तसेच( माजी जि.प अध्यक्ष व विद्यमान जि प सदस्या श्रीमती सरोज शिवाजी परब) यांच्यातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार कणकवली तालुक्यातील खाजगी पसंत शाळा असलदे – तावडेवाडी या प्राथमिक शाळेचे शिक्षक शांताराम धाकू जंगले यांना देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच (कै.योगेश विनायक कसालकर यांच्या स्मरणार्थ, श्रीमती विनया विनायक कसालकर पुरस्कृत) सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सातार्डा – रायाचेपेड येथील खासगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सचला शंकर आरोलकर यांना देऊन गौरविण्यात आले. निवृत्त शिक्षकांमधून दिनेश खोत यांना गौरविण्यात आले.त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याशिवायप गुणवंत शिक्षक पाल्यांना अग्निपंख पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शुभांगी देशपांडे ( होळीकर ) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला .यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष श्री.अरुण कुंभार,सचिव श्री.डी.जी.वरक, कार्याध्यक्ष रेनोल्ड भुतेलो,उपाध्यक्षा दर्शना गुळवे, नवनिर्वाचित सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू, माजी सरपंच उदय पारिपत्ये, ग्रामपंचायत सदस्या शर्मिला मांजरेकर, अर्चना धारगळकर,मुंबई येथील सातार्डा मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष महेंद्र मांजरेकर, विस्तार अधिकारी श्रीमती दुर्वा साळगावकर,केंद्रप्रमुख श्रीमती श्रद्धा महाले, माजी केंद्रप्रमुख रवींद्र गवस,सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद राऊळ उपस्थित होते.
स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्ध्येत प्रथम ज्योत्स्ना मधुकर गुंजाळ, द्वितीय सरिता द्वारकानाथ गोलतकर, तृतीय सचला शंकर आरोलकर,तृतीय(विभागून) स्वरा राऊळ,उत्तेजनार्थ श्रीम.प्राची बिले,विनया शिरसाट यांनी पारितोषिक पटकावले.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव श्री.डी.जी.वरक यांनी तर आभार मुख्याध्यापिका सचला आरोलकर यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन शिक्षक सचिन तुळसुलकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here