असनिये ग्रामपंचायतवर अखेर फडकला शिवसेनेचा भगवा..

0
146

सरपंच रेश्मा सावंत, उपसरपंचा सह सदस्यांनी केला मंत्री केसरकर यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडी ता.१६ : तालुक्यातील असनिये गाव विकास युवा पॅनलच्या सरपंच सौ रेश्मा सावंत, उपसरपंच सौ साक्षी सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

सावंतवाडी तालुक्यातील असनिये ग्रामपंचायतीवर गाव विकास युवा पॅनलची सत्ता आली होती.मंत्री दीपक केसरकर यांनी गावासाठी यापूर्वी विकास कामे केली आहेत. आणि भविष्यात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण लागेल तो निधी देणार असल्याचे आश्वासन मंत्री केसरकर यांनी दिल्याने गावाच्या हितासाठी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत असे यावेळी सरपंच सौ रेश्मा सावंत यांनी सांगितले.
आज संपूर्ण ग्रामपंचायत पॅनल ने मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी उपसरपंच साक्षी सावंत ग्रामपंचायत सदस्य सौ निधी नाईक सौ दर्शना दामले, भरत सावंत यांनी प्रवेश केला यावेळी राकेश सावंत संदीप सावंत जितेंद्र सावंत रमेश सावंत सतीश सावंत आनंद ठिकार प्रितेश ठिकार, लक्ष्मण सावंत, प्रेमानंद ठिकार, भिकाजी नाईक, सुभाष सावंत, दशरथ सावंत, देवेंद्र सावंत, ओमकार सावंत, आप्पा कोलते, सुरज कोलते, निलेश पोकळे, रुपेश सावंत,राकेश सावंत, जितेंद्र सावंत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here