भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी भेट देत दिल्या शुभेच्छा
वेंगुर्ले,दि.२२: येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर आज बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली. १४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली अशा गटात या स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब हे निमंत्रित होते. या स्पर्धेच्या निमित्ताने विशाल परब आणि सहकारी पदाधिकारी यांनी उपस्थित खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांची भेट घेत त्यांना प्रोत्साहन दिले. अशा प्रकारच्या स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करणे ही वेंगुर्ला तालुक्याची गौरवास्पद परंपरा असल्याचे सांगत भविष्यात या परंपरेला आपल्या माध्यमातून याहून अधिक उंचीवर निश्चितपणे नेणार असल्याचे श्री परब यांनी यावेळी सांगितले.
या स्पर्धेच्या निमित्ताने दिलेल्या भेटीच्या वेळी विशाल परब यांच्यासमवेत बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य एम.बी. चौगुले,सुरेंद्र चव्हाण, शीतोळे सर, जे.वाय.नाईक, क्रीडा संचालक सचिन रणदिवे, जिल्हा क्रीडा अधिकारी निलेश चमणकर, जिल्हा हॅलीबॉल असोसिएशन सचिव वि.पी.देसाई, शरद बोरवडेकर, बी.जी. गायकवाड, हेमंत गावडे, उपसरपंच वासुदेव गावडे, क्रीडा शिक्षक, पंचवृंद म्हणून अजित जगदाळे, अमित हर्डीकर, चिन्मय तेरेखोलकर, सॅमसन फर्नांडिस, ओंकार पाटकर, चारू वेंगुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.