गुरुजनांचा व वडीलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान करा..अध्यक्ष संतोष तळवणेकर

0
58

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग तर्फे होडावडे शाळा क्रमांक १ मध्ये शालेय साहित्यचे वाटप

वेंगुर्ला,दि.२४ : राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य. संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
या संघटनेच्या सिंधुदूर्ग शाखेच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे जिल्हा परिषद शाळा न.१ मधील ६३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर तसेच जिल्हा सल्लागार महेंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमचे अध्यक्षा ,होडावडा शाळा क्रमांक १ च्या मुख्याध्यापिका प्रशांती दळवी, तसेच प्रमुख पाहुणे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी बोलताना त्यांनी गुरुजनांचा व वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करा, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि धैर्य बाळगले पाहिजे. गुरुजनांच्या मार्गदर्शनाने शिकत असताना वडीलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे, तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेऊन आपले व आपल्या कुटुंबाचे व आपल्या गावाचे नाव तालुका, जिल्हा,राज्य तसेच देशपातळीवर कसे चमकेल याकडे लक्ष दिले पाहिजे, आणि समाजात आपले चांगले व्यक्तिमत्व उभे केले पाहिजे. अशा प्रकारचे मार्गदर्शन राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी केले.

यावेळी संघटनेचे सचिव रामचंद्र कुडाळकर,उपाध्यक्ष मंगेश माणगावकर,जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे ,खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, जिल्हा सल्लागार महेद्र चव्हाण,शिक्षक रविंद्र लोंढे , शिक्षिका अर्चना मक्राणे तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र लोंढे यांनी केले तर आभार राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे सचिव रामचंद्र कुडाळकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here