सावंतवाडी,दि.२०: नारळी पौर्णिमेला अर्पण करण्यात येणारा मानाचा नारळ आज ऐतिहासिक मोती तलावात अर्पण करण्यात आला. युवराज लखमराजे भोंसले व पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या उपस्थितीत हा नारळ तलावात अर्पण केला. सोमवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा दुसऱ्या दिवशी हा सोहळा संपन्न झाला.
शहरात घडलेल्या दुःखद घटनेमुळे सोमवारी या मानाच्या नारळाचे पूजन करण्यात आले होते. आज सायंकाळी विधीवत पद्धतीने हा सुवर्ण नारळ तलावात अर्पण करण्यात आला. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते नारळ अर्पण करण्यात आला. दरम्यान शहरवासियांनी उपस्थित राहत नारळ अर्पण केले.
यावेळी युवराज लखमराजे भोंसले, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, समीर वंजारी, दिलीप भालेकर, सचिन सावंत, एल एम सावंत, जीजी राऊळ, पोलिस दर्शन सावंत, महेश जाधव, सचिन कुलकर्णी, शरद सोमण, रत्नाकर माळी आदी उपस्थित होते.