बबन साळगावकर आणि मित्र मंडळाकडून करण्यात आला सत्कार..
सावंतवाडी,दि.१३: येथील तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे, उपाध्यक्षपदी माजी नगरसेविका माधुरी वाडकर,तर संचालक पदी माजी नगरसेविका शिप्रा सावंत यांची निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर मित्र मंडळाकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, माजी नगरसेविका अप्रोज राजगुरू, किशोर बोंद्रे आदी उपस्थित होते.