सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबुराव पराडकर यांचेही स्मारक सावंतवाडीत व्हावे..माजी नगराध्यक्ष साळगावकर

0
162

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज पराडकर यांचा स्मृतिदिन करण्यात आला साजरा

सावंतवाडी,दि.१२: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारका प्रमाणेच सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबुराव पराडकर यांचेही स्मारक सावंतवाडीत व्हावे, यासाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज पराडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, उद्योजक तथा बांधकाम व्यवसायिक दिनेश नागवेकर, राष्ट्रीय पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, जिल्हा सदस्य हरिश्चंद्र पवार, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, मोहन जाधव, सत्यजित धारणकर, राजू तावडे, नरेंद्र देशपांडे,राजेश मोंडकर, विजय देसाई, दीपक गावकर,रुपेश पाटील,विनायक गावस,शैलेश मयेकर,आनंद धोंड,प्रसन्ना गोंदावळे,शुभम धुरी,प्रशांत मोरजकर,भुवन नाईक
आदिंसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here