सावंतवाडी येथील बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी जवळील शौचालयाची बिकट अवस्था..

0
25

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी वेधले लक्ष…

सावंतवाडी,दि.१२: शहरात असलेल्या बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी जवळील नगरपालिका शौचालयावर गवत वाढल्याने त्या ठिकाणी साप,विंचू या सारखे प्राणी असण्याची शक्यता आहे. याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शौचालयाची बिकट अवस्था झाली आहे.

एकेकाळी ज्या नगर परिषदेणे कोकण व महाराष्ट्रामध्ये रँकिंग प्राप्त केली ती आज काही अधिकाऱ्यांमुळे अनेक समस्यांच्या फेऱ्यांमध्ये अडकली आहे.
याबाबत उद्या मंगळवारी साडेअकरा वाजता माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन या सर्व समस्यांबाबत त्यांचे लक्ष वेधणार आहेत.
या अनुषंगाने माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे ज्यांना त्यांच्या परिसरातील समस्या असतील त्यांनी उद्या साडेअकरा वाजता नगर परिषदेमध्ये उपस्थित रहावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here