..तर मंदार केणी यांची जिल्हा प्रवक्ते पदी नेमणूक..आमदार वैभव नाईक यांची माहिती
कणकवली,दि.०५: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या पुन्हा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कुडाळ मालवण मतदारसंघाचा स्वतंत्र कार्यभार त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे.
तर मालवण येथील मंदार केणी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेना प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले आहे.