शिरशिंगे ग्रामपंचायतच्या वतीने कोकण कला व शिक्षण विकास संस्थेमार्फत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन..

0
32

सावंतवाडी,दि.३१: तालुक्यातील शिरशिंगे ग्रामपंचायत आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेमार्फत आज बुधवार ३१ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन सरपंच दीपक राऊळ यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी उपसरपंच सचिन धोंड ,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक स्वप्निल तारी, पोलीस पाटील गणू राऊळ तंटामुक्ती अध्यक्ष नारायण राऊळ, माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ, सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे, प्रशांत देसाई, जीवन लाड,गुणाजी धोंड,गणपत राऊळ,राजेंद्र सावरवाडकर, फटू राऊळ,तुकाराम धोंड, बापू राऊळ,डॉक्टर स्नेहा लब्धे,जनरल फिजिशियन डॉ.प्रणव प्रभू, नेत्रतज्ञ डॉ. धुरी, लॅब टेक्निशियन अमित लिंगवत, कोकण संस्था समन्वयक हनुमंत गवस, भगवान चव्हाण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ यांच्या संकल्पनेतून हा आरोग्य शिबिर घेण्यात आला होता. भविष्यात याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात असे उपक्रम राबवून गावाचा विकास साधू असे मत यावेळी सरपंच दीपक राऊळ यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here