सावंतवाडी,दि.३१: अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या सौजन्याने कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) बाबाजी पास्ते व दैनिक प्रहारचे पत्रकार रविंद्र तावडे उपस्थित होते. यावेळी बोलतांना विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना या शैक्षणिक साहित्याचा चांगला उपयोग करून उत्तम शैक्षणिक प्रगती साधावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी अर्चना फाउंडेशनचे व उपस्थितांचे आभार मानले.