सह्याद्री पट्ट्यातील भाजपा युवा नेतृत्व श्री संदीप एकनाथ गावडे वाढदिवस विशेष…

0
23

सावंतवाडी,दि.२९:(आनंद धोंड) सर्व सामान्यांना आपलासा वाटणारा,जनसामान्यांमध्ये वावरणारा राजकारणाचा उपयोग जनतेसाठी, त्यांच्या हितासाठी करणारा सह्याद्री पट्ट्यातील युवा तडफदार चेहरा म्हणजे संदिप एकनाथ गावडे.

मूळ फणसवडे येथील असणाऱ्या संदिपजींचा जन्म सावंतवाडीत झाला. डोंबिवली येथे त्यांनी आपल उच्च शिक्षण पूर्ण केल. एम.बी.ए फायनान्स ही पदवी त्यांनी संपादित केली. आई-वडिलांनी दिलेला समाजसेवेचा वारसा ते पुढे घेऊन गेले. जिल्हा परिषद अध्यक्ष असणाऱ्या मामा चंद्रकांत गावडे यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले‌. याचदरम्यान भाजपचे नेते, कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या ते संपर्कात आले. रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावीत होऊन त्यांनी राजकारणात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतला.

अल्पावधीतच गावडे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर जनतेला आपलसं केलं. आणि आता भाजपचे युवा नेतृत्व म्हणून सह्याद्रीच्या पट्ट्यात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

डोंबिवली सारख्या ठिकाणी काम करत असतानाच आपल्या जन्मभूमीत देखील जनतेसाठी काहीतरी करावे या हेतूने ते काम करू लागले.

याच दरम्यान २०१५ रोजी भाजप पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी त्यांना उमेदवारी देण्याच ठरलं. परंतु, आरक्षण पडल्यानं ही संधी हुकली. मात्र, जनतेची केलेली कामे, विकासाच असणारं व्हिजन यामुळे पक्षाने त्यांना पंचायत समिती लढविण्याचे आदेश देऊन त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी दिली.

पक्षादेश मानून संदीप गावडे यांनी विलवडे पंचायत समितीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. याच दरम्यान २०१७ ला मोठ्या मताधिक्याने ते या मतदारसंघातून विजयी झाले‌.
पंचायत समिती सदस्य म्हणून मतदारसंघातील गावांच्या विकासावर त्यांनी जोर दिला. विलवडे, भालावल, कोनशी, सातोळी- बावळाट, केसरी-फणसवडे, देवसू,दापोली,पारपोली आदी गावांच्या पायाभूत सुविधांकडे त्यांनी लक्ष दिला. पंचायत समिती सदस्य कसा असावा याच एक उत्तम उदाहरणच त्यांनी आपल्या पहिल्याच टर्ममध्ये सिद्ध केलं.

यातच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विलवडे पंचायत समिती मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींवर त्यांनी भाजपच कमळ फुलवल‌ं. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने त्यांची आंबोली मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती केली.

या कार्यकाळात आंबोली, चौकुळ व गेळे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा रोवण्यात संदीपजींचा सिंहाचा वाटा होता.
जिथे भाजपच कमळ फुलत नव्हतं तिथे त्यांनी भाजपच्या विचारांचा सरपंच बसवला. गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकीतून ते विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत.शालेय विद्यार्थांना वह्या वाटप, शालोपयोगी वस्तूंच वाटप ते करत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते हे कार्य अविरत करत आहेत.

अभ्यासुपणे काम करणारा एक कार्यकर्ता अशी जनसामान्यांमध्ये त्यांची ओळख आहे. स्वतःला ते कधीही नेता समजत नाहीत. कार्यकर्ता म्हणूनच राहणं आपल्याला पसंत असल्याचे ते आवर्जून सांगतात.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे ते निकटवर्तीय व विश्वासू शिलेदार आहेत. त्यांच्या माध्यमातून गेल्या २ वर्षात गावडे यांनी १०८ कोटींची विकासकामे त्यांनी तालुक्यात केली आहेत.

रस्ता, वीज, पाणी या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते नेहमीच आग्रही राहीलेत. प्रसंगी शासनाची वाट न पहाता स्वतःच्या खिशातून खर्च करून त्यांनी या सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्यात. विहीर, बोअरवेल मारून देत पाण्यासाठीची वणवण थांबवली‌ आहे. काळाची गरज ओळखून आंबोली घाटाला पर्यायी असणारा केसरी फणसवडे रस्ता व्हावा यासाठी ते आग्रही राहीले‌त. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला. मंत्री चव्हाण यांच्यामुळे हा रस्ता मंजूर झाला असून लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे.

नुकतेच गेळे गावच्या कबुलायतदार प्रश्नासाठी संदीप गावडेंनी आमरण उपोषण छेडलं. शासन निर्णय होऊन, पालकमंत्र्यांनी निर्देश देऊनही जिल्हाधिकारी जागा वाटपास टाळाटाळ करत असल्यानं त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सलग दोन दिवस आमरण उपोषण केलं.

या उपोषणाला दुसऱ्या दिवशी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट देत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना महसूल मंत्र्यांकडे शुद्धीकरण प्रस्ताव पाठवून जमीन वाटपातील अडचणी दूर करण्याचे आदेश त्यांनी दिले. सर्व्हे नं.१९ आणि २० यातील अडचण दूर करत महसूल मंत्र्यांना फोन करून याबाबतचे शुद्धीपत्रक शासनाला पाठवण्याचे निर्देश दिले‌. मागील जीआरमधील त्रुटी दूर करून शुद्धीपत्रकासाठीचा प्रस्ताव शासनाला तात्काळ पाठवायला सांगितला‌. तो प्रस्ताव पाठवल्यानंतर संदिप गावडे यांनी आमरण उपोषण मागे घेतले. गेळेच्या वनसंज्ञा लागलेल्या जमीनीचाही पाठपुरावा ते करत आहेत. रवींद्र चव्हाण यांनी महसूल व वन यांचे मंत्री व प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विषय मार्गी लावण्यास पाठपुरावा केलाय. त्यामुळे आंबोली आणि चौकुळचा वनसंज्ञेचा प्रश्नही मार्गी लागण्यासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे. देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या गावाला तब्बल ७६ वर्षांनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळणार आहे. ”हा क्षण माझ्यासह गेळे ग्रामस्थांसाठी सुवर्णक्षण असेल, ग्रामस्थांच्या एकीचा ही विजय आहे. एकसंघ होऊन आम्ही लढा दिला त्यामुळे हे शक्य झाले. आज आमच्या संघर्षाला अखेर यश आले आहे.

गेळे कबुलायतदार जमीन वाटपाच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. आवश्यक गोष्टीसाठी येणाऱ्या दिवसांत आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.” यात आमच्या पाठिमागे खंबीरपणे उभे असणारे व खऱ्या अर्थाने पालकत्वाची भूमिका पार पाडणारे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आपण विशेष आभार मानत असल्याची भावना संदीप गावडेंनी व्यक्त केली.
ग्रामस्थांसाठी लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी झगडणाऱ्या संदिप गावडेंच्या लढ्याला यश आले.

त्यामुळे खऱ्या अर्थानं गणेशोत्सवात गेळे ग्रामस्थ दिवाळी साजरी करणार आहेत. एवढच नव्हे तर आंबोली आणि चौकुळच्या जमीन प्रश्नांचा मार्ग ‘गेळे पॅटर्न’ मुळे सुखकर होणार आहेत.

यासह क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांना भविष्यात संधी मिळावी यासाठी क्रीकेट चषक ते दरवर्षी भरवतात.

जिल्ह्यातील फुटबॉल प्रेमींची संख्या व इथल्या भागात शेजारील गोवा राज्याप्रमाणे फुटबॉल खेळाला वाव मिळावा म्हणून फुटबॉल चषकाच आयोजन त्यांनी केले. बहुदा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलाच भव्य फुटबॉल चषक असावा.

केवळ, यावर न थांबता त्यांनी टीम सिलेक्टरना आणत फुटबॉल प्रशिक्षण घेतलं. इथल्या मुलांना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिल. त्या फुटबॉल पटूना स्कॉलरशिप दिली. एक कॉमनमॅन म्हणून ते राजकारणात सक्रिय आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या माध्यमातून लोकांची काम करण्यासारखा दुसरा आनंद नाही अशी त्यांची भावना आहे‌‌.

आबालवृद्ध आपल्याला त्यांच्या अडीअडचणींत फोन करतो, त्यांची सेवा करण्यात मला धन्यता प्राप्त होते असं ते आवर्जून सांगतात. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी मी या विचारांवर चालणारा हा भारतीय जनता पार्टीचा एक कट्टर कार्यकर्ता आहे.

अशा या दिलदार नेत्याला,जनतेच्या आणि युवकांच्या ‘संदिप दादा’ला कोकण दर्शन डिजिटल मीडिया या चॅनल तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here