सावंतवाडी,दि.२५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध भागात रस्ते, नागरिकांच्या घरांचे तसेच शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातही पावसाचा जोरदार फटका नागरिकांना बसला असून माडखोल गावातील ठाकूरवाडी आणि परिसरात पावसाने नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कोकण प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे – परब यांनी नुकतीच केली असून सदर नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पक्षाच्या वतीने योग्य तो पाठपुरावा करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सावंतवाडी शहराध्यक्ष सायली दुभाषी, युवती तालुकाध्यक्ष सुधा सावंत तसेच माडखोल येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.