आजगाव,धाकोरेत सुरु असलेल्या दहा ते पंधरा अनधिकृत चिरेखाणी तात्काळ बंद करा…

0
171

बाळकृष्ण हळदणकर यांचे तहसीलदार उंडे यांना निवेदन..

सावंतवाडी,दि.०६: आजगाव व धाकोरे या दोन गावात सदयस्थिती तब्बल दहा ते पंधरा ठीकाणी अनधिकृत चिरे उत्खनन होत आहे त्यामुळे परिसरात प्रदुषण होत आहे त्यामुळे निसर्गसपन्न गावात सुरू असलेली हा चोरटा प्रकार तात्काळ थांबवा अशी मागणी तेथिल ग्रामस्थ बाळकृष्ण हळदणकर यांनी सावंतवाडी तहसिलदारांकडे केली आहे.
दरम्यान चुकीच्या पध्दतीने सुरू असलेल्या या खाणींवर दंडात्मक कारवाई करा अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा सुध्दा त्यांनी दिला आहे.
याबाबत श्री हळदणकर यांनी तहसिलदार अरुण उंडे यांना दिलेले निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. यात असे नमुद करण्यात आले आहे की आजगाव व धाकोरे ही दोन्ही गावे फळबागायत आणि निसर्गसपन्न आहेत,या गावातील लोकांची रोजीरोटी याच फळबागायती आणि शेतीवर अवलंबून आहे. गेल्या काही महीन्यापासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अहोरात्र चिरेखाण व्यायसाय सुरू आहे. तब्बल दहा ते पंधरा ठीकाणी उत्खनन होत आहे, त्यामुळे येणार्‍या हंगामात त्याचा फटका फळझाडांना बसू शकतो
त्यामुळे अशा प्रकारे चिरेखाणी सुरू राहील्यास जैवविविधतेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेवून प्रत्यक्ष पाहणी करा आणि संबधित चिरेखाणी तात्काळ बंद करा अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असे त्यांनी या पत्रात नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here