स्थानिक लोकांनी सावध राहण्याची गरज : मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ
सिंधुदुर्ग,दि.१०: येथील दोडामार्ग तालुक्यात डोंगराळ भाग जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात कमी किंमतीत जमीनी हस्तगत करू शकतो यासाठी नेते मंडळी आणि उच्च अधिकाऱ्यांना हाताशी धरून गावातील लोकांची फसवणूक करून जंगल पट्टा जमीनी N/A करून अधिकाऱ्यांचे किसे भरून सोन्याचा भाव असलेली जमीनी कवडी मोलाने हस्तगत करतात. आता तर गावाच्या नकाशावर पण या लाॅबीच्या माणसांच्या नावे ५००/६०० एकर जमीनी दिसु लागल्या, आणि काही नेते मंडळीना हाताशी धरून गावातील लोकांना आमीष दाखवून अधिकाऱ्यांना हाताशी धरून लोकांना धमकावून जमीनी बळकावतात आणि त्या जमीनीत बेकायदेशीर वृक्षतोड करतात हे भु माफियांना कुठे मोठा प्रकल्प यांयची चाहुल लागली की तेथील जमीनीवर कशाही परिस्थितीत ताबा मिळवायला येतात.
हल्लीच एका गावातील ग्रामस्थाचे दोडामार्ग तहसीदार कार्यालय येथे तीन दिवस उपोषण चालु होत हे उपोषण एका बड्या नेत्याच्या आणि अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने चौकशीच्या आश्वासनाने मागे घेण्यात आल,यांचा पुढे निर्णय न लागता या सर्वाना हाताशी धरून ही “भु माफिया” लाॅबी लोकांशी बेईमानी करून जमीनी हस्थांतरीत करतात या विषयातील लोकांच्या तक्रारीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि प्रदेश सरचिटणीस संदिप दळवी,कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांच्या नेत्वृवाखाली मनसे शिष्टमंडळ सखोल चौकशी करून स्थानिक लोकांना घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी दिली आहे.