सिंधुदुर्गातील वाहन चालकांना योग्य तो दिलासा मिळावा..

0
25

माजी आमदार राजन तेली यांनी घेतली गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट

सिंधुदुर्ग,दि.०५: जिल्ह्यातील टॅक्सी चालकांना बॅचेस च्या कारणास्तव गोव्यात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यामुळे दिलासा मिळवा अशी मागणी गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे आज माजी आमदार राजन तेली यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार तरूण नोकरी-धंद्यानिमित्त जवळच्या गोवा राज्यावर अवलंबून आहेत. खासकरून अनेक वाहनचालक गोव्यात परमिटच्या गाड्या चालवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, त्यांचे वाहन परवाने एम एच ०७ (सिंधुदुर्ग जिल्हा) असल्याने गोवा आरएटीओ कडून नाहक दंड आकारला जात आहे. त्यामुळे या वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनचालकांना नाहक भुर्दंड बसत असल्यामुळे त्यांना योग्य तो दिलासा मिळावा अशी मागणी राजन तेली यांनी निवेदनाद्वारे गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली.

यावेळी सोबत प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली,शेखर गावकर, प्रीतेश राऊळ, संजय सातार्डेकर, युवामोर्चा दोडामार्ग मंडळ अध्यक्ष पराशर सावंत, देवेंद्र शेटकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here