सावंतवाडी,दि.२८: कोकणातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यांना उच्च शिक्षणासाठी विविध दालने उघडावी यासाठी भारतीय जनता पार्टी कोकणात सातत्याने उपक्रमशील आहे.
खासदार नारायण राणे आणि राज्याचे बांधकाममंत्री, तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आज सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील जि.प. पूर्व प्राथमिक केंद्रशाळा सांगेली नंबर १ मध्ये भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली शाळकरी मुलांना मोफत दप्तर आणि वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना विशाल परब
म्हणाले की भारतीय जनता पार्टी ही कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज असून भारताचे उद्याचे भविष्य असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, आरोग्य आदी क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी भाजपा सर्वतोपरी मदत करणार आहे. कोकणचे नेते नारायण राणे आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्यात येत असून त्याची जबाबदारी मी मनापासून स्वीकारली आहे. यापुढेही अशा पद्धतीने गरजवंत विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असून त्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी विशाल परब यांच्यासह मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंढरीनाथ राऊळ, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, माजी सरपंच वामन नार्वेकर, माजी सैनिक आनंद राऊळ, दयानंद सावंत, शांताराम सावंत, बाळा राऊळ,संतोष नार्वेकर, महेश राऊळ, महेश रेमुळकर,सुनयना सांगेलकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल परब यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.