सावंतवाडी येथे निरंजन डावखरे यांचा पुष्पगुच्छ देत केला सत्कार
सावंतवाडी,दि.२२: कोकणचे नेते नारायण राणे, बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह सर्वच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकसंघपणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पूर्ण ताकद लावलेली आहे. येत्या २६ जूनला होत असलेल्या पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यावेळी रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येतील असा विश्वास भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केला आहे.
खासदारकीच्या निवडणुकीत भाजपाने दाखवलेला करिश्मा या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसेल असे ते म्हणाले. सावंतवाडी येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले उमेदवार निरंजन डावखरे यांचे पुष्पगुच्छ देत विशाल परब यांनी त्यांचे स्वागत केले व निवडणूक रचने संदर्भात चर्चा केली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आमदार निरंजन डावखरे,जिल्हा महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी आमदार राजन तेली, लखमराजे भोसले,
जिल्हा बँक संचालक महेश सारंग,मनसे जिल्हा अध्यक्ष अनिल केसरकर,राष्ट्रवादी प्रांतीक सदस्य काका कुडाळकर,पदवीदार निवडणूक संयोजक प्रमोद रावराणे, सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंधावळे, आंबोली मंडल अध्यक्ष रवी माडगावकर,भाजपा बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी संयोजक संजू शिरोडकर,सूत्र संचालीका रूपा शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते. पदवीधर मतदार संघात निरंजन डावखरे यांच्या प्रचारात भाजपाने निर्विवाद बाजी मारल्याचे चित्र दिसून येत आहे.