जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत केली चर्चा
सिंधुदुर्ग,दि.०३: जिल्ह्यातील बहुतांश तरुण,युवक,युवती नोकरी धंद्या निमित्त गोव्यात ये-जा करत असतात.
खासकरून अनेक वाहन चालक, टॅक्सी ड्रायव्हर गोव्यात परमिटच्या गाड्या चालवून आपला उदर निर्वाह करत आहेत.मात्र त्यांचे परवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याने गोवा आरटीओ कडून नाहक दंड आकारला जात आहे.
त्यामूळे टॅक्सी ड्रायव्हरांना गोव्यात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने माजी आमदार राजन तेली यांनी आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन याबाबात त्यांना दिलासा मिळाला यासाठी निवेदन देऊन चर्चा केली.
तसेच आरोग्य व्यवस्था,मोपा एयरपोर्टमध्ये नवीन जागा भरती होणार आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्गातील जास्तीत-जास्त युवांना संधी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच गोवा पत्रादेवी हद्दीवर स्थानिकांना होणारा त्रास पाहता त्यांच्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.