आंबेली माणगावकरवाडीला पाण्यासाठी करावा लागतोय संघर्ष!

0
37

अर्चना घारे यांनी गावकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून..

दोडामार्ग,दि.२६: तालुक्यातील आंबेली माणगावकरवाडी या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी भेट दिली. तेथील गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. आजही पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. गेले पाच दिवस विद्यूत पुरवठा खंडीत असल्याने पाच दिवस माणगावकरवाडी अंधारात आहे. मागच्या पंधरा वर्षांत कोणीही वाडीत फिरकलेल नाही अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त करत अर्चना घारे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशाप्रकारची मागणी आंबेली माणगावकरवाडी लोकांनी सौ. अर्चना घारे यांच्याकडे केली.

आंबेली माणगावकरवाडीला अर्चना घारे यांनी भेट देत गावकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी महिलांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. पाण्यासाठी महिला कॅनलला जातात. पाण्याची सोय नसल्याने कपडे धुण्यासाठी त्या ठिकाणी जावे लागते. काही वर्षांपूर्वी एक महिला येथून वाहून गेली होती. कॅनलमधून पाणी वापरणे जीवघेणे आहे अशी व्यथा महिलांनी अर्चना घारे यांच्यासमोर मांडली. येथील महिलांना पिण्याचे पाणी अपुरे आहे. वापरातील पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून दररोज या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणे ही अत्यंत गंभीरबाब आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सर्वेश माणगावकर (ग्रा.सदस्य), नेहा गवस (ग्रा.सदस्य), दशरथ माणगावकर, दिलीप माणगावकर, दिलीप माणगावकर, देवानंद माणगावकर, अशोक माणगावकर, दक्षता माणगावकर, अभिषेक माणगावकर, दिपाली माणगावकर, नीता गवस, निखिल गवस, आदी ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विवेक गवस, दोडामार्ग महिला अध्यक्षा ममता नाईक, ओबीसी सेल अध्यक्ष उल्हास नाईक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here