कुमार संकेत जाधव व कुमारी आर्या सावंत प्रशालेत ९०% गुणासह प्रथम
सावंतवाडी,दि.२७: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कलंबिस्त संचलित कलांबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त शाळेचा निकाल १००% टक्के लागला असुन शाळेतून कु.संकेत कृष्णा जाधव व कुमारी आर्या रामचंद्र सावंत हे दोन्हीं विद्यार्थी ९०% गुणासह प्रशालेत प्रथम आले आहेत. अमृता अरविंद पास्ते ८७.४०% गुणांसह द्वितीय तर तन्वी दशरथ पास्ते ही ८५.४०% गुणांसह तृतीय आली आहे.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत, उपाध्यक्ष गोविंद लिंगवत, सचिव यशवंत राऊळ,चंद्रकांत राणे, मुख्याध्यापक अभिजीत जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, यांच्यावतीने दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.