युवा नेते संदीप गावडे यांच्या हस्ते प्रवेश
सावंतवाडी,दि.१८: केसरी देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा माजी उपसरपंच सिताराम सावंत यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपचे युवा नेते तथा माजी तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांच्या हस्ते पक्षात प्रवेश देण्यात आला. यावेळी पक्षाचे कार्य व विचांरापासून प्रेरित होऊन आपण हा निर्णय घेतला असून केसरी गावात भाजप पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास श्री. सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आंबोली मंडळ अध्यक्ष रवी मडगावकर, बुथ अध्यक्ष भिवा सावंत, प्रभाकर सावंत, श्रुती सावंत, भरत गोरे, उपसरपंच संदीप पाटील, वाय.डी सावंत, अशोक सावंत, उपतालुकाध्यक्ष अमोल सावंत, अनुसूचित मंडळ अध्यक्ष गुरुनाथ कासले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



