चिपळूण,दि.०३: (ओंकार रेळेकर) विषारी प्रचार करून मतदारांना प्रलंबित करण्याचा विरोधकांचा डाव आहे मतदारांनी यांच्या आश्वासनाला बळी पडू नये केंद्रात मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायणराव राणे यांचा विजय होणे गरजेचे आहे राणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी कोकरे जिल्हा परिषद गटाच्या गुरुवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात बोलताना केले
विषारी प्रचार करून मते मिळवण्याचा डाव आखण्यात आला आहे गैरसमज पसरवण्यात येत आहे यासाठी सावध रहा आणि विखारी प्रचार खोडुन काढा असे आवाहन आ .शेखर निकम यांनी करून ना राणेंच्या विजयात कोकरे गटाचे मताधिक्य प्रचंड असणार हे आजच्या मेळाव्याच्या गर्दीने दाखवून दिल्याचं आ शेखर निकम यांनी स्पष्ठ करीत ही ताकद अशीच ठेवा आणि मतपेटीतून ताकद आता दाखवून द्या असे आवाहन त्यानी केले
।। प्रचंड गर्दी आणि घोषणांचा दणदणाट।।
कोकरे जिल्हा परिषद गटाचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील गावाचा मेळावा कूटरे येथे घेण्यात आला होता यावेळी आ शेखर निकम,माजी आ सदानंद चव्हाण,माजी आ मधु चव्हाण,भाजपा प्रदेशउपाध्यक्ष अतुल काळसेकर,शिवसेना तालुकाप्रमुख बापू आयरे प्रसिद्ध उद्योजक पिंट्याशेठ पाकले,भाजपा तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर नियोजन सदस्य शशिकांत चाळके,माजी सभापती शरद शिगवण,राजेंद्र मोलक,प्रकाश कांनसे,युवा सेना तालुकाधिकारी निहार कोवळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थती होते यावेळी आ निकम बोलत होते
।। हीच ताकद आता मतपेटीतून दाखवा।।
मेळाव्याला झालेली प्रचंड गर्दी कार्यकर्त्याचा उत्साह आणि घोषणांचा दणदणाट बघून आ. शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करीत आजची ही गर्दी अभूतपूर्व आहे ही ताकद आता मतपेटीतून दाखवून द्या असे आवाहन आ शेखर निकम यांनी करून आपल्या जिल्ह्याच्या कोकणचा विकास करण्यासाठी ना राणे यांना निवडून जाणे महत्वाचे आहे ना राणे याच्या विजयात येथील मतदारांचे योगदान मोठे असणार असून महायुतीची ताकद आता मतपेटीतून साऱ्या जिल्ह्याला दाखवून द्या असे आवाहन आ.निकम यांनी केले
।। विषारी प्रचार।।
विरोधकांनी आता विषारी प्रचार सुरू केला आहे कोणतेच मुद्दे राहिले नसल्याने आशा पद्धतीचा प्रचार करून मते घेण्याचा डाव आखण्यात आला असून असल्या विखारी प्रचार खोडून काढा आणि सारे समाज एकसंघ ठेवा असे आवाहन आ शेखर निकम यांनी आज केले
।। तेवढी हिम्मत नाही ।।
घटना बदलणार असा प्रचार केला जात आहे मात्र घटना बदलली जाणार नाही आणि तशी हिम्मत कोणाकडे ही नाही आज या घटनेवर देश स्थिर आहे लोकशाही ठिकून आहे मात्र अपप्रचार केला जात असल्याने कार्यकर्त्यांनी असल्या प्रचाराचा मुद्दा खोडून कुटील डाव उधळून टाकण्याचे आवाहन आ निकम यांनी केले
।।देशाला मोदींची गरज।।
यावेळी माजी आ सदानंद चव्हाण यांनी सांगितले की आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज आहे देश आणि देशातील जनता मोदींच्या हाती सुरक्षित आहे याचा अनुभव उत्तरप्रदेश आणि काश्मीर येथील जनतेला विचारा असे सांगून जगता देशाची मान उंचवण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे कोकणचा विकास आणि मोदींना बळ देण्यासाठी ना राणे यांना या विभागातून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन त्यानी केले
।। कार्यकर्त्यांचे कौतुक।।
केवळ एक दिवसाचे नियोजन करून घेण्यात आलेला कूटरे येथील मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी बघून आ निकम माजी आ चव्हाण आणि उपस्थित मान्यवरांनी उपतालुकप्रमुख सिद्धार्थ कदम आणि राष्ट्रवादीचे विभागप्रमुख संजय कदम व कार्यकर्त्यांचे साऱ्यांनी कौतुक केले मेळाव्याच्या गर्दीचे छायाचित्र सोशल मीडियावर जाताच या मेळावाच्या गर्दीची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू होती एवढा भव्यदिव्य मेळावा कार्यकर्त्यांनी उस्फुर्तपणे केला होता
।।जबरदस्त वर्चस्व।।
आ शेखर निकम आणि माजी आ सदानंद चव्हाण या दोन्ही नेत्याचे या विभागावर प्रचंड वर्चस्व आहे खरी लढत या दोन्ही मध्ये या ठिकाणी होत असते आणि हे दोन्ही या ठिकाणी एकत्र आल्याने महायुतीची ताकद वाढली असल्याचे आजच्या मेळाव्याने दाखवून दिले आहे
।।अनेकांची उपस्थिती।।
यावेळी राजू गुजर,समीर जाधव,मानसी रसाळ,चेतना निकम,समीक्षा गोसावी,संतोष गुजर,रवींद्र मोहिते,सुरेश गँगरकर,अरविंद कदम ,दत्ताराम गुजर, सुधीर राजेशिर्के, अनिल चव्हाण,राजू होवले, निलेश खापरे,बंड्या विचारे, सचिन चव्हाण,यशवंत भागडे,राजाभाऊ पाष्ठे दिलीप बामणे,तुकाराम मोरे,संतोष चव्हाण,निलेश यादव,संतोष निकम सचिन झाडे, मुन्ना विचारे,बाळू राजेशिर्के,प्रशांत चव्हाण,अनिल सकपाळ,बाबू शिर्के,विष्णू सकपाळ मारुती होडे प्रसाद कदम,रवींद्र होडे,निलेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.