विनायक राऊत यांच्या प्रचाराचे काम हे राष्ट्रकार्य समजून करावे :भास्कर जाधव

0
42

चिपळूण,दि .२६: (ओंकार रेळेकर)खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचे काम हे राष्ट्रकार्य समजून करा आपल्याला पुन्हा आपली निशाणी धनुष्य बाण मिळवायची आहे त्या मुळे आपल्या धगधगत्या मशालिने पेटून उठून काम करा आपला निवडून आलेला एक एक खासदार महत्त्वाचा आहे आता पासून कामाला लागा असे आवाहन उध्दव बाळासाहेब ठाकरे नेते आ.भास्कर जाधव यांनी केले .

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे उमेदवार श्री. विनायकजी राऊत यांच्या प्रचारार्थ पेढे जिल्हापरिषद गट व कोंढे पंचायत समिती गण मेळावा शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री मंगल कार्यालय पेढे, ता. चिपळूण येथे आज शुक्रवारी संपन्न झाला. या वेळी आ.जाधव बोलत होते.यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी ही आगळी वेगळी निवडणुक आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी विनंती करणार आहे की सर्व मतभेद बाजूला ठेऊन विनायक राऊत यांच्यासाठी काम करा कारण ते राष्ट्र कार्य आहे. आज राष्ट्र धोक्यात आहे, आज संविधान धोक्यात आहे म्हणून सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणे गरजेचे आहे. अंतर्गत मतभेद विसरून, जुना नवा समन्वय साधून काम करा आणि विनायक राऊत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले. पुढे त्यांनी खासदार विनायक राऊत यांचे कौतुक करत ते कसे मतदारसंघांसाठी अहोरात्र कार्यरत असतात हे सांगितलं. असा उमेदवार आपल्याला लाभलाय हे आपलं भाग्यच आहे त्याचबरोबर ते राबवत असलेली प्रचार यंत्रणा कौतुकास्पद आहे आणि म्हणून आपण त्यांना निवडून दिल्लीला पाठवणे गरजेचे आहे असे ही सांगितलं.
यावेळी खा.विनायक राऊत,आ.भास्कर जाधव,शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन कदम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी खा.विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात भाजपा आणि सर्व विरोधकांवर जोरदार टिकेची झोड उठवली, युवराज मोहिते, विक्रांत जाधव, सचिन कदम, जितेंद्र दळवी, श्रीमती जांभेकर मॅडम, विनोद झगडे, जितेंद्र जनवडे, बाळा कदम, सुधीर दाभोलकर, मंगेश सिंदे, सौ.मानसी ताई, सौ. तृप्ती महाडिक आदी इंडिया आघाडीचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here