सावंतवाडी,दि.१२ : येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.
सावंतवाडी शहरात संजू परब यांच्या कार्यालयाच्या बाजूला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे प्रचार कार्यालय उघडण्यात आले आहे. शनिवारी सकाळी माजी खासदार श्री राणें यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार राजन तेली शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री परब यांनी दिली.