महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग व गुरुवर्य समुहाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन
सिंधुदुर्ग,दि .१२: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग व गुरुवर्य समुहाच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता चौथी व पाचवी मधील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मार्गदर्शन वर्गात इयत्ता ४ थी व ५ वी मधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. अनुभवी तज्ञ मार्गदर्शकांद्वारे व्यावसायिक अँपद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. दर आठवड्याला विद्यार्थ्यांच्या शंकचे समाधान तसेच मार्गदर्शक व्हिडीओ सोयीनुसार केव्हाही बघता येणार आहेत. स्पर्धा परीक्षेवरील विविध साहित्य pdf स्वरूपात App वर उपलब्ध केले जाणार आहे. संपूर्ण वर्षभर मार्गदर्शनाबरोबर प्रत्येक घटकावर सराव प्रश्नपत्रिका, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन कार्यशाळा, शेवटच्या दोन महिन्यात प्रश्नपत्रिका सराव असे या मार्गदर्शन वर्गाचे स्वरूप आहे.
या मार्गदर्शन वर्गात साहभागी होण्यासाठी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक ९८६०२५२८२५, कार्यवाह सुनिल करडे ८४८४००३३९९ यांच्याशी संपर्क साधावा असे शिक्षक परिषदेमार्फत आवाहन करण्यात आलेले आहे.