निष्काळजीपणाने नाही तर भ्रष्ट्राचाराने घेतला जीव, भाजपच्या प्रवक्त्याचे घणाचे घाव..

0
156

नवी दिल्लीः गुजरातमध्ये रविवारी रात्री घडलेल्या मोरबी पुलाच्या दुर्देवी घटनेबद्दल जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यातच गुजरात सरकारवरही प्रचंड टीका केली जात आहे. एकीकडे हे सुरु असतानाच गोवा भाजपच्या प्रवक्त्यानेही भाजपवरच निशाणा साधला आहे. या प्रकरणी भाजपच्या गोवा विभागाचे प्रवक्ते सॅव्हियो रॉड्रिग्स यांनी ट्विट करत भाजपवरच जोरदार टीका केली आहे. त्यामुळे गोवा राज्यातील भाजपही आता गोत्यात आले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, मोरबी पुलाची घडलेली घटना दु:खद आणि भयावह आहे.

यामध्ये अनेक चुका आहेत. याबद्दल जर आपण जबाबदारी घेतली नाही तर याचा अर्थ आपण आपल्या लोकांची काळजी घेत नाही असा होतो. अशा दुर्दैवी दु:खद अपघाताला भ्रष्टाचाराच मूळ कारण आहे.

भ्रष्टाचारामुळेच 49 मुलांना आपला जीव गमवावा लागला तर 134 लोकांचा यामध्ये हाकनाक मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे गोवा विभागाचे प्रवक्ते सॅव्हियो रॉड्रिग्स यांनी मोरबी दुर्देवी घटना ही भ्रष्टाचाराचे मूळ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी त्या प्रकारचे ट्विट केल्यानंतर त्यांच्या या ट्विटला अनेकांनी प्रतिसाद देत टीकेची झोड उठवली आहे.

सॅव्हियो रॉड्रिग्स यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या असल्या तरी, फ्रँकी नावाच्या युजरने लिहिले की, “हे खूप दुःखद आहे! 100 पेक्षा जास्त लोकांना हाताळण्याची क्षमता नसलेल्या पुलावर त्यापेक्षा जास्त लोकांना परवानगी का देण्यात आली.

असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता या अपघाताचा अहवाल काय येतो त्याची वाट बघणेही महत्वाचे आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

तर रॅग नावाच्या दुसर्‍या एका युजरने लिहिले आहे की, जुना पूल असताना आणि क्षमतेपेक्षा जास्त लोकांना त्या पुलावर का जाऊ दिले असं सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here