लहान मुलांची तस्करी करून विक्री करणाऱ्या टोळीचा तपास करून कारवाई करा

0
81

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन व सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन..

सिंधुदुर्ग,दि.०६:जिल्ह्यात लहान मुलांना दत्तक देऊन त्यांची विक्री करणारी टोळी कार्यरत आहे.गरजू पालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपये हडप केले जातात सर्रास असे प्रकार जिल्ह्यात निदर्शनास येत आहेत.याची पोलीस चौकशी होऊन योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे.याबाबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले.

दत्तक देणे प्रकरणात कोणतेही कायदेशीर कागदपत्रे केली जात नाही,कालांतराने ती टोळी पालकांवर च मुले अपहरणाची तक्रार करतात पालकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो.ही टोळी मुले कुठून आणतात याचा तपास होणे गरजेचा आहे व तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर,उपाध्यक्ष मिलिंद धुरी,सचिव विष्णू चव्हाण सहसचिव ॲड मोहन पाटणेकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष संदीप सुकी,कुडाळ तालुका अध्यक्ष आर. के सावंत,सदस्य आनंद कांडरकर,परेश परूळेकर,मनोज तोरस्कर,निसार शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here