सावंतवाडी,दि.०२: येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे सामंत ट्रस्ट तर्फे बांदा येथील सुषमा मुळीये,अर्धांगवायूच्या आजाराने पिडीत सखाराम सावंत,कर्करोग पिडित हरीश्चंद्र पवार,गर्भाशयाच्या आजाराने पिडीत शांती शेडगे, तसेच पेंडूर येथील विजया गावडे आणि साहील गावडे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेतून सामंत ट्रस्ट तर्फे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी कित्येक वेळा गरजू व्यक्तींना आर्थिक स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे.