सौ.अर्चना घारे-परब यांची तहसिलदार श्रीधर पाटील यांच्याकडे मागणी
सावंतवाडी,दि.०१ : येथील तहसिलदार श्रीधर पाटील यांची राष्ट्रवादी कोकण विभाग महिला काँग्रेस पक्ष अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी भेट घेत २०१९ – २०२१ सालातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी आणि व्यापारी यांना नुकसान भरपाई मिळण्यास होणाऱ्या दिरंगाई बद्दल तहसीलदार श्री पाटील यांच्याशी सौ. घारे यांनी सविस्तर चर्चा केली.
दरम्यान बोलताना शासनाने शेतकरी आणि व्यापारी यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले असून देखील, नुकसान भरपाईसाठी आलेली ७५ % रक्कम दिली जात नाही. यामागचे कारण काय आहे ? तसेच यासाठी काही शासकीय कागदपत्रांची पूर्तता करायची आहे का ? या बाबत सौ घारे यांनी विचारणा केली.
या चर्चेमधून काही शेतकऱ्यांची KYC, करण्याचे काम अपूर्ण असल्याने, ते पूर्ण झाल्यावर १५ मे पर्यंत सर्व शेतकरी आणि व्यापारी यांना नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल. असे तहसीलदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
तसेच KYC करण्यासाठी काही संस्थानी प्रशासनाला मदत करावी त्यासाठी आम्ही आमच्या अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून नक्की मदत करू असे आश्वासन यावेळी दिले. नुकसान ग्रस्त शेतकरी आणि व्यापारी बांधवानी यासाठी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी सौ. अर्चना घारे-परब यांनी केले.
यावेळी त्यांच्यासोबत सायली दुभाषी, राकेश नेवगी, हिदायततुला खान, विवेक गवस, गौरांग शेरलेकर, ऋतिक परब आणि श्रीकांत कोरगावकर तसेच सावंतवाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.