उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांचा केसरकरांवर खोचक टोला
सावंतवाडी,दि.१९: येथील नरेंद्र उद्यान येथे सुरु करण्यात आलेली वन सफर ३१ मार्च पर्यत मोफत ठेवण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री यांनी करून देखील या वन सफारीसाठी वन विभागाकडून शुल्क आकारले जातं असल्याने केसरकर यांनी ऐन आचारसंहितेच्या काळात फसव्या घोषणा करून नागरिकांची दिशाभूल केली आहे.अशी टीका सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी केली आहे.
सावंतवाडी नरेंद्र वन उद्यान येथे वनविभागाने नुकताच वन सफर हा जगंल सफारीवर आधारित उपक्रम सुरु केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधू रत्न योजनेमधून वन सफारीसाठी वाहन ही उपलब्ध करून दिले आहे. या वाहनातून संपूर्ण नरेंद्र उद्यानाची जगंल सफर नागरिकांना घडवून आणली जाणार आहे. या वन सफर पर्यटन प्रकल्पाचें उदघाट्न मंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले होते. यावेळी त्यांनी ही सफर सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी ३१ मार्च पर्यंत पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अशी घोषणा केली होती. त्यानंतर वन विभागांकडे वन सफर घडवून आणण्यासाठी नागरिकांची मागणी वाढत आहे परंतु या सफरीसाठी ठराविक शुल्क आकारले जातं आहे याबाबत नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांच्याकडे तक्रारी केल्या असून लोकसभा निवडणुक आचारसंहिता लागण्याच्या अगोदर चार दिवसापूर्वीच ही घोषणा मंत्री केसरकर यांनी केली होती त्यां घोषणेचें काय झाले याची आठवण सुभेदार यांनी करून देत निवडणुका डोळ्या समोर ठेवून उठसुठ घोषणा केसरकर यांच्याकडून केल्या जातं आहेत त्यां त्यांनी थांबवाव्यात अशी मागणी सुभेदार यांनी करतं वन सफारी साठी वनवीभागाकडून शुल्क आकारले जात आहे मुळात केसरकर यांनी ही सफर मार्च महिना संपेपर्यत मोफत असणार आहे याचा लाभ नागरिकांनी घेण्याचें आवाहन केले होते. परंतु नागरिकांना ही सुविधा विना शुल्क दिली जात नाही असा कित्येक नागरिकांना अनुभव आला आहे त्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले.
तसेच काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात सावंतवाडी पर्यटन महोत्सव होणार असल्याची घोषणा देखील केसरकर यांनी केली होती मात्र लागलेली आचारसहीता चार जूनला संपणार त्यामुळे पर्यटन महोत्सव पावसात होणार का? असा सवालही यावेळी सुभेदार यांनी केला आहे .
दरम्यान सुभेदार यांनी बोलताना वनविभागाचे अधिकारी मंत्री केसरकर यांचे ऐकत नाहीत त्यांचा आता प्रशासनावर ताबा राहिलेला नाही अशा प्रकारची टीका यावेळी सभेदार यांनी केली.