वैभववाडी,दि.०४: तालुक्यातील श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे या प्रशालेत विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असणारे स्वप्निल श्रीकांत पाटील यांना अविष्कार फाउंडेशन इंडिया तर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संपूर्ण देशभरात २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्ताने राज्यातील विज्ञान शाखेत कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता विज्ञान शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या व करत असलेल्या कार्याची दखल घेऊन सन २०२४ हा राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक पुरस्कार देण्यात आला. हा गौरव वितरण सोहळा शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे रविवार दिनांक ३ मार्च २०२४ सकाळी पार पडला या क्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र हेरकर हे होते तर अध्यक्षस्थानी प्राध्यापक किसनराव कुराडे संयोजन श्री रंगराव सूर्यवंशी यांनी केले तर आयोजन संजय पवार यांनी केले होते सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री स्वप्निल श्रीकांत पाटील विज्ञान शिक्षक यांचा शिक्षक भरती वैभववाडी चे अध्यक्ष श्री अविनाश शामराव कांबळे सचिव श्री संजय कुमार खिमा आडे संघटक श्री रामचंद्र शिवराम घावरे पदाधिकारी व सदस्य यांच्यातर्फे स्वप्निल श्रीकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
Home ठळक घडामोडी शिक्षक स्वप्निल पाटील यांना अविष्कार फाउंडेशन इंडिया तर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक...