चिपळूण बाजारपेठेतील सागर कॅसेट लायब्ररी चे मालक व्यावसायिक अनंत उदेग यांचे निधन

0
99

चिपळूण,दि.०३ (ओंकार रेळेकर) : शांत संयमी आणि मनमिळावू स्वभावाने चिपळूण बाजार पेठेत एक प्रतिष्ठित व्यावसायिक म्हणून गेली अनेक वर्ष परिचित असलेले अनंत बाळाराम उदेग यांचे शनिवारी निधन झाले.मृत्य समयी त्यांचे वय ६६ होते.चिपळूण मधील प्रसिद्ध दत्त एजन्सीज चे मालक उद्योजक वसंत शेठ उदेग यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.त्यांचा बारावे विधी मंगळवार दिनांक १२ मार्च रोजी कळवंडे येथे राहत्या घरी होणार आहे.चिपळूण बाजारपेठेतील सागर कॅसेट लायब्ररीचे ते मालक होते.
त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्वर्गिय अनंत उदेग यांचा सागर कॅसेट लायबरी नावाने चिपळूण बाजार पेठेत सर्वात जुना व्यवसाय होता सुमारे २५ वर्षापुर्वी फार कमी लोकांकडे टीव्ही संच असायचे या काळात रंगीत टीव्ही आणि व्हीसीआर भाड्याने मिळण्याचे चिपळूण शहरात सागर कॅसेट लायबरी हे ठिकाण होते.त्या काळात लोक आवडीने टीव्ही भाड्याने नेऊन नवनवीन चित्रपट कुटुंबीय आणि मित्रमंडळी सोबत पाहत असे हीच वेगळी ओळख अनंत उदेग यांची होती.शहरातील शिवाजी चौक येथील सागर कॅसेट लायब्ररी चे मालक अनंत बाळाराम उदेग यांचे शनिवारी दिर्घ आजाराने कळवंडे येथील निवासस्थानी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. मिरजोळी येथील दत्त एजन्सीज चे मालक आणि ज्येष्ठ उद्योजक वसंत उर्फ दादा उदेग यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. सुमारे ३५ वर्षाहून अधिककाळ उदेग हे व्यवसायात होते. सुरूवातीला घडयाळ दुरूस्ती आणि त्यानंतर ते कॅसेट व्यवसायाकडे वळले. एकेकाळी कॅसेट च्या जमान्यात उदेग यों सागर कॅसेट लायब्ररी ही प्रख्यात होती आणि डिजीटल माध्यमकाळात आपले अस्तित्व टिकवून आहे. अलिकडे ते आजारी होते. अश्यात शनिवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर कळवंडे येथील स्मशानभुमीत सायंकाळी त्यांयावर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पसिरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here