सावंतवाडी,दि.१५: तालुक्यातील शिरशिंगे गोठवेवाडी ही शिवकालीन मनोहर – मनसंतोष गडाच्या पायथ्याशी वसलेली वस्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श या भूमीला लागले असल्याची माहिती येथील जाणकार व्यक्ती सांगतात.
गोठवेवाडी येथे दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दरवर्षी शिवभक्त जयंतीच्या आदल्या दिवशी मनोहर – मन संतोष गडावर जाऊन जयंती दिवशी सकाळी पहाटे तेथील देवतांची पूजा करतात व सकाळी पहाटे गडावरून शिवज्योत पेटवून गोठवेवाडी येथे आणली जाते त्यानंतर शिवप्रतिमेचे व शिवज्योतीचे पूजन केले जाते.
अशी परंपरा येथील युवकांनी गेली कित्येक वर्षे जपली आहे.
यावर्षीही १९ फेब्रुवारी रोजी सकाळी पहाटे साडेसात ७.३० वाजता मनोहर मनोहर संतोष गडावरून शिवज्योतीचे आगमन होणार आहे. नंतर नऊ ९ वाजता शिवप्रतिमेचे व शिवज्योतीचे पूजन केले जाणार आहे.१० वाजता अल्पोपहार, १०.३०ते१२.३० विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ०१ ते ०३ दरम्यान महाप्रसाद असणार आहे.
तरी सर्व शिवप्रेमींनी या शिवजयंती उत्सवास उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव गोठेश्वर ग्रामविकास मंडळ व शिवतेज मित्र मंडळ गोठवेवाडी यांनी केले आहे.