हनुमंत गडाच्या संवर्धनासाठी शिवरथ यात्रेचे आयोजन

0
140

सावंतवाडीत यात्रेचे जंगी स्वागत

सावंतवाडी दि.२२;फुकेरी येथील हनुमंत गडाच्या संवर्धनासाठी शिवरथ यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे जंगी स्वागत सावंतवाडीत करण्यात आले. दोडामार्ग येथून बांदा मार्गे माजगाव सावंतवाडी अशी ही शिवरथ यात्रा आली. सावंतवाडी संस्थानाच्या राजवाड्यात तसेच वटसावित्री मंडळ बाजारपेठ, तीनमुशी आधी ठिकठिकाणी या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले .गडाच्या संवर्धनासाठी सावंतवाडीकरांचा सहभाग असेल असा विश्वास यावेळी सावंतवाडीकर बांधवांनी दिला .आज दुपारी ही शिवरथ यात्रा वाजत गाजत सावंतवाडीत आली. सावंतवाडी संस्थानाच्या राजवाड्यात युवराज लखम सावंत भोसले,राणी श्रद्धा भोसले आदींनी स्वागत केले. तेथून सावंतवाडी खासकिलवाडा चार नंबर शाळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शिवरथ यात्रा माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर व मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानाकडे आल्यावर फटाके वाजवून व सुहासिनीनी ओवाळून जंगी स्वागत करण्यात आले .यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी नगरसेवक तथा मराठा समाजाचे पदाधिकारी सुधन्वा आरेकर, मराठा समाजाचे प्रेमानंद देसाई, सौ सुमंगल आरेकर. मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या महिला तालुकाध्यक्ष सौ संजना परब, सौ आर्वी आरेकर, श्री आदित्य आरेकर, अजित सावंत, सीमा राठोड, जयश्री बिजे,साक्षी दळवी,साधना शिर्के, कमलेश उर्फ बंड्या आरेकर,ज्योती तांबे,राजेंद्र मोरजकर, मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे सचिव एडवोकेट संतोष सावंत,सहसचिव विनोद सावंत, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,संतोष मुळीक,पोलीस लाईन च्या मार्गावर माजी नगरसेवक उमेश कोरगावकर,मिलिंद देसाई,अखिल केसरकर,अमय मोरे आधीनी जंगी स्वागत केले .सावंतवाडी बाजारपेठ या ठिकाणी रिक्षा चालक-मालक व्यापारी आणि मराठी बांधवांनी व शिवभक्तांनी तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालय निवासस्थानी येथे जंगी स्वागत करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान देवी माऊली कला क्रीडा मंडळ फुकेरी यांच्यावतीने ही शिवरथ यात्रा काढण्यात आली होती. येथील हनुमंत गड संवर्धन साठी काढण्यात आलेल्या शिवरथ यात्रेचे जंगी स्वागत करताना माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर व श्री आदित्य आरेकर , मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या महिला तालुकाध्यक्ष संजना परब, सौ सुमंगल आरेकर,आर्वी आरेकर, कुमारी परब आधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here