वेशभुषा स्पर्धेची काव्या गावडे मानकरी; रांगोळी स्पर्धेत सायली भैरेची बाजी…
सावंतवाडी,दि.२८: “जल्लोष रामलल्लाचा” या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ओंकार कलामंचाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या रिल्स स्पर्धेत साईश गावडे याने प्रथम क्रमांक पटकावला. तर पार्थ सावंत द्वितीय, केतन कुलकर्णी यांने तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमातील स्पर्धकांची रिल्स काढणाणार्या यत्वेश राऊळ यांना विशेष बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी घेण्यात आलेल्या वेशभुषा स्पर्धेत काव्या गावडे प्रथम, श्रावणी आरोंदेकर आणि शमिका आरोंदेकर यांना द्वितीय क्रमांक विभागून तर गौरव कळणेकर याला तृतीय क्रमांक देण्यात आला.
अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ओंकार कलामंचाच्या माध्यमातून येथील श्रीराम वाचन मंदिराच्या समोर आयोजित करण्यात आलेल्या जल्लोष रामलल्लाचा या कार्यक्रमात ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तर यावेळी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत सायली भैरे प्रथम, पुर्वा चांदरकर द्वितीय तर स्वराली हरम आणि जेसिता गोम्स यांना तृतीय क्रमांक विभागुन देण्यात आला. यातील रिल्स स्पर्धेचे परिक्षण सिध्देश सावंत आणि हेमंत पांगम यांनी केले. वेशभुषा स्पर्धेचे परिक्षण दिपेश शिंदे आणि रोहित पाळणी यांनी केले. तर रांगोळी स्पर्धेचे परिक्षण सलाम तहसीलदार यांनी केले. यातील यशस्वी स्पर्धकांना लवकरच बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, असे ओंकार कलामंचाच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.