सावंतवाडी,दि.२१: तालुक्यातील नेमळे देऊळवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर रविवारी सकाळी अचानक कोसळली यामुळे येथील पंधरा कुटूंबाचे पिण्याच्या पाण्याचे हाल होणार आहेत.
नेमळे देऊळवाडी येथील ही अती जीर्ण झालेली सार्वजनिक विहीर (सालयची विहीर) म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी प्रसिद्ध होती या विहिरीला ७० वर्षे पूर्ण झाल्याने विहिरीच्या आतील चिऱ्याचे दगड सडून गेल्याने विहीर धोकादायक झाली होती. मात्र रविवाऱी सकाळी विहिरीचा कठडा आणि विहीर दिसत नसल्याने विहीर गायब कुठे झाली याची एकच खळबळ उडाली यासाठी येथील ग्रामस्थांनी याची कल्पना नेमळे ग्रामपंचायतिला दिली ही बातमी समजताच नेमळे सरपंच सौ दीपिका भैरे, उप सरपंच सखाराम राऊळ, ग्रामसेवक चौहान,तलाठी पाटोळे. यांनी कोसळलेल्या विहिरीची पाहणी करून लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.