मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून होणार मतमोजणीला सुरुवात.. उमेदवारांची उत्कंठा शिगेला..
सावंतवाडी, दि.१९: तालुक्यात एकूण ५२ ग्रामपंचायती पैकी तीन ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्याने उरलेल्या ४९ ग्रामपंचायतिची मतमोजणी होणार असून निकाल उद्या येथील तहसिलदार कार्यालयात होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रकीयेला सुरूवात होणार असून एकुण पाच फेऱ्यात ही मतमोजणी असणार आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याना उभे राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जागा देण्यात आल्या आहेत, अशी माहीती सावंतवाडी तहसिलदार अरुण उंडे यांनी दिली.
दरम्यान गेले आठ दिवस ग्रामपंचायत वर आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी झटणारे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवार यांची काही तासात होणाऱ्या निकालासाठी उत्कंठा शिगेला पोचली आहे.